संघवी केशरी महाविद्यालयात २ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीच्या औचित्याने राष्ट्रीय योजना विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये *'स्वच्छता ही सेवा'* या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसर आणि महाविद्यालय ते दसरा चौक यादरम्यान *स्वच्छता रॅली* काढून समाजामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. यादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक गोळा करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग यांच्याकडे तो सुपूर्त करण्यात आला.
यानंतर महाविद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा सुधाकर बैसाने(प्रीतम प्रकाश महाविद्यालय भोसरी) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आज संपूर्ण जगाला गरज असून विद्यार्थ्यांनी आपल्या अंतर्मनाची स्वच्छता कशी करावी याबाबत अतिशय चांगले मार्गदर्शन केले. तसेच लालबहादूर शास्त्री यांचे कार्य, त्यांचे साधे राहणीमान आणि उच्च विचार, त्यांची शेतकऱ्यांबद्दल असणारी अस्ता
याबाबत सविस्तर विवेचन त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये केले. यावेळी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रविण जावीर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले एन.एस.एसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीवा रुजविण्याचे काम करतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिश पवार होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मागील आठवडाभर चाललेल्या चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा यामध्ये विषय झालेल्या स्पर्धकांना गुलाबपुष्प, प्रमाणपत्र, गांधी विचारांची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.धिरज शाखापुरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. नितिन जाबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शितल शिरवले यांनी केले.
या उपक्रमात महाविद्यालयातील डॉ. संतोष काशीद, प्रा. अविनाश कदम, प्रा. प्रशांत काजळे, प्राध्यापकेतर सहकारी श्री. सागर हणमगोंड, श्री. तुकाराम ढेंगळे यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीमान.शांतीलालजी लुंकड, ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान ॲड. राजेंद्रकुमारजी मुथा , कोषाध्यक्ष श्रीमान.प्रकाशचंदजी चोपडा व कार्यकारी अधिकारी श्रीमान.खंडू खिलारी यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.